पहिला पाऊस क्र 2✍️
!! पहिला पाऊस!!क्र 2
तप्त होती धरणी मशागत सारीचं करुनी
तुटून पडला पाऊस सोबत वादळ वारा वरुनी.
धंगधगत्या ज्वाळावर पडु लागल्या जलधारा
लाही लाही झाली, गधं सुटला वाढवत पसारा.
मिळु लागलं बिजास पाणी पक्षी गात गाणी
अंकुर फुटू लागला हिरवळ दाटली मनी
सृष्टी गेली मोहरुनी जीव गेला सुखाऊनी
घुसळून निघालीत पंचतत्व जागवत सत्व
सृष्टी निर्मिती यातून जलधार सत्व
ऊन पाणी वारा माती घर्षण एक तत्व©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment