व्यसन

|| व्यसन || 


लागतंय तारुंण्यात  व्यसन 
आकर्षणातुन सुरवात पण 
अनंत प्रकार व्यसनाचे 
गुटखा तंबाखू दारूपण…
 
मटका सट्टा जुगार 
चोरी मारामाऱ्या  वासनांध 
कुणाला लागतं कसलं 
आगळा  वेगळा छंद…
 
परिणाम होता त्याचे 
आजारपण अवेळी म्हातारपण 
व्यसनाने येतं मरणपण 
छंदात फंदात जेलफाशीपण…
 
डुंबतो  संसार त्यांचा 
त्रास होतो इतरांना 
दुःख होतं कुटूंबास 
पाहवत नाही यांना मरतांना…


 
प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव ©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे