कोजागिरी ✍️ ( क्र 1 )
||कोजागिरी||
आज चंद्र पूर्ण
कलांनी जवळ फुलला
टाकुन दुधात मसाला
जायफळ घालु चला.
स्वच्छ आकाशी टिपूर
चादणं पडलं चला
अंधारात प्रकाश दिला
चांदण्यात खुलून दिसला.
साठवु उष्णता चला
दुधात शोधु त्याला
आनंद मनात भरला
लागु स्वागत सज्जतेला.
महत्व कोजागिरी पौर्णिमेला
आकाश गंगेत चंद्राला
आहे अंधारात आधार
त्याचाच सर्व जीवाला.
संम्पला ऋतू पावसाचा
शीतलता घेऊन आला
वाढेल गुलाबी थंडी
उष्ण पदार्थ जीवाला.
भरू मन प्रसन्नतेला
महत्व खुपच दिवसाला
सुरवात होणाऱ्या ऋतूला
हवीय शीतलताही मानवाला.
________________________
प्रदीप पाटील
गणपूर तालुका चोपडा जळगाव ©®


Very nice
ReplyDeleteखूप खूप छान सर
DeleteKhup sunder
ReplyDelete