नवरात्रौत्सव ( क्र 1) ✍️

 नवरात्रौत्सव....

जिजाऊ, रमाई, सावित्री , 
वाढल्या, लढल्या, झगडल्या 
दिशा संदेश देऊन
अजरामर साऱ्या जाहल्या.... 

अनंत झाल्यात माता 
सांगुन सार्यांनी गीता 
पुत्र, पिता, भाऊ 
झटल्या समाजा करता.... 

प्रसंगी झाशी दुर्गा 
गाडुन दृष्ट सारे 
यांच्याच मुळे वाहू 
 लागले नव वारे ..... 

यांचाच उत्सव जागर 
झाल्यात आई माता 
दिली मानवास दिशा 
सोसून सारं स्वता.....


 


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर तालुका चोपडा 
जिल्हा जळगाव.  ©®


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे