फुलपाखरू (क्र 1)

 || फुलपाखरू ||

अंडी अळी कोष
यातुन उडतं फुलपाखरू
रंगी बेरंगी मनमोहक 
रानांत उडतं पाखरू…

लहानथोर यांच्या मनात  
सुंदरता भरते डोळ्यात.
आनंदात बागळते रानावनात
पावसांत  लपतंय झुडपात…

कधी खेळते अंगणात   
अवस्था हि सुंदर भारी
मिसळत लहान मुलात
हवी हवी वाटणारी…

अंड्यांचा त्रास नाही
कोषात पडुन राही
अळीत खात राही
 उपद्रव देत राही…

अळींची असली अवस्था 
शेतकर्यानंची करते दुर्वेवस्था  
नको ती अळी
खातो शेतकरी   खस्ता…

विविध रुपं फुलपाखरूचे  
पहिलं असतं निरूउपद्रवी  
दुसरं अळीत उपद्रवी 
तिसर्यात कसं रे मोहकता दावीं…

 बहुरूपी नं पाहिला असा
 खाऊन माजलास जसा
पडून राहतो कोषात जातो
पंख फ़ुटले  मजेत कसा…


प्रदीप पाटील
गणपूर. ता.चोपडा
जिल्हा.जळगाव 
©®



Comments

  1. खुपचं छान

    ReplyDelete
    Replies
    1. छान काव्यरचना दादा 👌💐💐

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे