कर्तृत्ववान पुरुष ✍️
| | कर्तृत्ववान पुरुष | |
(आण्णासो. कै.वेडू झिपरू पाटील )
काळ पारतंत्रातील देशाचा
हिवराईने सारा नटलेला
एकोप्यात गावागावात वसलेला
गणपूर सातपुडा पायथ्याला.
आले झिपरू पोटी 1911ला
वेडू आण्णा नावारूपाला
कष्टात वाढले शिकले
1989 ला अंनताला.
एकच ध्यास विकास
रस्ते शाळा पाणीपुरवठा
पोस्ट ऑफिस एस टी
साऱ्यात पुढाकार मोठा.
संस्थापक सातपुडा दुध डेअरी
जनक अनेर डावा कालवा
सं. स्थानिक चेअरमन हायस्कुलचे
वसा त्यांचा गावात चालावा.
ज्ञान प्रबोधन कार्य अविरत
फलक लेखन करत
लोकं शब्द त्यांचा झेलत
ते अपेक्षा सार्थ करत.
ज्ञानदान शिकवण सत्याची
शान होती गावाची
गोडी सदैवं समाजकार्याची
ख्याती परिसरात आंण्णाची.
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

Comments
Post a Comment