माझे गाव ✍️
| | माझे गाव | |
सातपुडा पर्वतरांग पायथ्यास
अनेर नदी काठास
होती वनराई खास
जन्मलो गणपूर गावास...
तत समई सुंदर
वाडे घरे चिरंबंदी
होती गावास तटबंदी
मध्यभागी मंदिर मारोतीनंदी...
बाराबलुतेदार सारी भाऊबंदी
जोपासून अस्तित्व स्वजातीचे
सोबत समजून मातीचे
हात आधार प्रीतीचे....
जाणत दुःख एकमेकांचे
मानसन्मान जगण्यास शिवार
सोय न होती शिक्षणाची
आजोबांनी जाणला विकास सार...
आणली माध्यमिक शाळा
उभारली दुध सह. संस्था
आले अनेर धरण भेटून मंत्री
आणला डावा कालवा होती आस्था...
चांगलं कार्य सहभाग त्यांचा
वसा चालतोय जसा
ओढ समाजकारण राजकारणाची
सांगतोय माणुसकी जोपासा....
विविध संस्थेत पदे
भूषवतोय प्रदीप गावातील
काळ थोडा बदलला
घर काँक्रीट झालीत मातीतील...
गावकूस बदलतांना पाहिली
जाणकारांनी नाती जोपासली
सर्व काम गाव सहकार
म्हणूनच गावात वस्ती वसली....
ग्रामपंचायत शाळा विविध संस्था
मुख्य प्रवेश द्वार जवळ
सुपीक काळी कसदार माती
माणसे सारी सोज्वळ...
पैसा दिसतोय कमी
पण माणुसकीची हमी
गाव माझं गुणी
कीर्ती किती वर्णु मी....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®

आपलं गाव आपल्याला जीवापाड आवडतं. आपल्या गावावर आपण जीवापाड प्रेम करतो. माझं गाव माझी जबाबदारी या भावनेने सर्वजण एकत्र मिळून काम करतात. फारच लक्षवेधक !
ReplyDeleteजन्मभुमीचा सन्मान....छान
ReplyDeleteNice kakasaheb
ReplyDeleteVery nice
ReplyDelete