कविता म्हणजे ✍️
| | कविता म्हणजे | |
मनातुन आलेला भाव
घेऊन सृष्टीचा बोध
नवंनवं विचारांचा शोध
घेत रहस्याचा वेध.
घेऊन सृष्टीचा बोध
नवंनवं विचारांचा शोध
घेत रहस्याचा वेध.
यमकास घालुन साद
गमकाचा कुठं उन्माद
लयीत मांडत भाव
आनंदाची मिळते दाद.
गमकाचा कुठं उन्माद
लयीत मांडत भाव
आनंदाची मिळते दाद.
कल्लोड भाव भावनांची
छटा आकाश ताऱ्यांची
आक्रोश व्यथा मांडण्याची
सद्विचार आनंद फुलण्याची.
छटा आकाश ताऱ्यांची
आक्रोश व्यथा मांडण्याची
सद्विचार आनंद फुलण्याची.
मांडणी सल अंतरीची
उत्सव जाणीव नात्यांची
वाटचाल भावनांवर स्वार
मंद पणती प्रकाशाची.
उत्सव जाणीव नात्यांची
वाटचाल भावनांवर स्वार
मंद पणती प्रकाशाची.
गाथा तेज शोर्याची
साथ होते प्रेमाची
उब माय माऊलीची
गीत मांडणी कवी कलाकाराची.©️®️
साथ होते प्रेमाची
उब माय माऊलीची
गीत मांडणी कवी कलाकाराची.©️®️
प्रदिप मनोहर पाटिल
मु. गणपूर ता. चोपडा.
जिल्हा. जळगाव
©®
मु. गणपूर ता. चोपडा.
जिल्हा. जळगाव
©®

अतिशय सुंदर !
ReplyDeleteजबरदस्त...!
ReplyDeleteजबरदस्त....!
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteखूपच छान कविता
ReplyDelete