आठवांचा बहर ✍️

| | आठवांचा बहर | |


शांत असतं मन 

मजेत जगायची  धून

जातो आपण विसरून 

येतो  भूतकाळ चालून.... 


होतो कसं आपण 

कोणी दिला हात 

त्यांनी केला घात 

मनात न्हवती  जातपात.... 


आईबाबा करत रातपहाट 

शाळा कॉलेज वाट 

मस्तीची सारी पहाट 

चाले मागणीचे रहाट.... 


 मध्यान जीणं  रोमहर्ष 

कधी दुःख हर्ष 

व्यस्त जीव संघर्ष 

कुठं मायेचा स्पर्श... 


आता वय साठ

घालता आठवणीचा  घाट 

बागेत पक्षींचा  किलकिलाट 

आली वाटतं  रानवाट....


येतो बहर फुलांना 

जवळ आनंद मुलांना 

खेळ जीवनाचा  जगतांना 

समाधान शांती आठवणी आठवतांना... 




प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा 
जिल्हा. जळगाव 
 ©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे