स्वामी विवेकानंद ✍️

| | स्वामी विवेकानंद | |

विषय :- स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत असलेला युवक. 

  स्वामी विवेकानंद नुसतं नाव घेतलं कि एक हसमुख तेजपुंज युवक डोळ्या समोर व्यक्तिमत्व   तरळुन जातं. स्वतः सौन्दर्यवान असुन सुद्धा कधी त्या सौन्दर्य बद्धल अभिमान. गर्व न करता युवक कसा असावा तर स्वामी  विवेकानंद सारखा साऱ्या पृथ्वीतला तील जनतेला वाटावा  असा आदर्श पुरुष. ऐकोनिसाव्या शतकातील आदर्श युवक म्हणून स्वतः त्यांची गणना होते सामाजिक आध्यात्मिक  अगाध ज्ञान असलेलं गुरु प्रिय  व्यक्तिमत्व. वक्तृत्त्व  गोड वाणी तुन साऱ्या दुनियेला वेड लावले . हे झाले त्यांच्या बाबतीत थोडक्यात माहिती सांगण्या सारखं खुप आहे पण थाबतो. 

     आपला मुळ विषय कडे वळतो स्वामी यांना अभिप्रेत युवक  देश धर्म बद्धल आदर असलेला स्वधर्म पाळून ईतर धर्माचा आदर करणार असावा  सर्वधर्माच्या अन जगातील सर्व  महिलांना आई बहिणीचा दर्जा देणार  कुठंही स्त्री ला वाईट वासनेच्या नजरेत पाहणारा नसावा. त्यांच्या शिकागो येथील भाषणात प्रथमच त्यांनी विश्वा समोर इंग्रजी तुन सर्व बसलेल्या श्रोत्यांना अन तोच संदेश जगाला दिला  माझे प्रिय भाऊ बहिणींनो हे एक वाक्य जगातील मानवाला भावुन गेलं अगदी तोच भाव  विश्व् बंधुत्वाचा सर्व युवकां मध्ये असावा.  भुमाते  बद्धल गुरु, आईवडील बद्धल आदर करणारा. त्यांची आज्ञा प्रमाण मानणारा पाळणारा . तसंच तारुण्यात शांती, संयम, संयम  सर्वच बाबतीत  काम, क्रोध,  मोह, मद,  मत्सर विरहित सर्व इंद्रियावर ताबा असलेला  विवेक, व्यसनमुक्त, प्रबळ इच्छाशक्ती असलेला सामर्थवान ध्येय निष्ठ आज्ञाधारी शरीर कमवुन दीन दुःखी यांना मदत करणारा. सात्विक भावना रोमरोमात भरलेला आदर्श युवक समाजकार्यात वाहून देणारा. जीव जिवा वर प्रेम करणारा सारी मानव जातीचं हित कल्याणकरणारा असावा 

   कुठं द्रुष्टता भ्रष्ट भ्रष्टाचार व्यभिचार कधीच मनात येऊ न देता आदर्श माणूस बनणारा युवक असावा. 


         स्वामी विवेकानंद यांना आदर्श सत्वशील,  आध्यात्मिक  समाजकार्य करणारा बलदंड   युवक अभिप्रेत . माझ्या मता प्रमाणे तर सन  1863-1902 या नवतरुण अल्प जीवन जगलेला पण आदर्श  कीर्तिवंत प्रति स्वामी  विवेकानंदच हवा. 


प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव 
 ©️®️

Comments

  1. अतिशय अभ्यासपूर्ण !

    ReplyDelete
  2. प्रेरणादायी छान

    ReplyDelete
  3. खूपच छान लेख

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे