देवतारी कि आयुर्वेद ✍️
आयुर्वेद किं देवतारी
आज मि सत्यावर आधारित माझ्या लहानपणीच्या निरीक्षनातून दिसलेलं चित्र मांडणार आहे.
मी शाळेत शिकत असतांनाचा काळ साधारण 1980 ते 90 पर्यतचा. शाळेत जातायेतांना गावाबाहेर चौकात एक पिरबाबा चं ठाणं (असं म्हणतात पीर संत मृत झाल्यावर त्यांच्या नावानं बांधलेली समाधी तेथे लोकं पूजाअर्चना करतात त्याला पीर चं ठाण किंवा ठाणं म्हणतात.)होतं अजून पण आहे. तेथे एक निबांच झाडं आहे. त्या झाडाखाली दोन सख्खे भाऊ सिकंदर आणि सरदार असी त्यांची नावं. पिंजारी समाजाचे ग्रहस्थ. एक जमाना होता किं त्या दोघं भावांच्या वडिलांची आणि त्यांची गावालागत खुप जमीन होती.परिसरातील श्रीमंत व्यक्ती होते असं मी लोका कडून आयकत होतो. पण त्यांच्या रुबाबदार वागण्या मुळे संम्पत्ती ऱ्हास झाला अन भिकारी बनण्याची त्या दोघांवर पाळी आली. कुटुंबउध्वस्त झालं. शेतजमीन शून्य झाली अन रस्त्यावर येऊन दारोदारी भीक मागून लोकांनी दिलेल्या अन्नावर पोट भरायची वेळ आली. त्याच वेळी मला समजलं "पैसा आलं किं माजू नये" त्याच जीवन्त उदाहरण डोळ्या समोर दिसतं होतं. जुनी जाणकार लोकं सांगतात ते खरं असतं तेच समोर दिसतं होतं.असो. त्या दोघं भावांचं एकमेकात खुप जीव होता. दोघे कायम सोबत राहायचे. एकदा सिकंदर किं सरदार नावं असेल कोण ते सांगता येणार नाही पण त्यांच्यातील एक जण आजारी पडला. सिकंदर अन सरदार त्यांची नावं पण मुलं मुकंदर सिकंदर सिनेमा च्या नावावरून त्यांना सिकंदर मुकंदर म्हणतं. काही मुलं त्यांची मजा घेत तर काही त्यांना मदत करतं असतं. हा तर एक जण आजारी पडला. त्याची तबेत खुप खालवली. त्यात त्याच्या दोघं पायाला जखम झाली. जखम वाढतं वाढतं पायाच्या पंजा फक्त दिसतं होता अन वरती गुडघ्या पर्यंत फक्त मागील भागात. शरीराची कातडी चिपकली होती पायात असलेली हाडकं दिसायला लागली . जर दवाखान्यात गेले असते तर. त्याचा पाय तोडवा लागला असता.डॉक्टरी भाषेत ग्यगंग्रीन झालं असंच पण अश्या हि परिस्थिती मध्ये एक जण. झाडं होतं निबाचं त्या सावलीत पडलेला असायचा. दुसरा गावात भाजीभाकरी मागून त्याला खाऊ घाले. असं करतं असतांना पायाला मास शिल्लक राहत नव्हतं असं वाटतं असतांना हळूहळू काही दिवसा नंन्तर. पायाला मास यायला लागलं. अगदी चमत्कार सारखं वाटतं होतं. गेली चार महिने आजारी पडलेला माणुस. दुरुस्त होताना दिसायला लागला होता. त्यावर उपचार तर काय सुरु होते काय माहित पण पायाला तेल लावताना दिसतं होते आणि नींबाच्या झाडाची साल रोज. कुटतांना दिसतं होते. मला वाटतं नव्हे नक्कीच ज्या झाडाखाली ते राहत होते. त्या झाडाची कोरडी लिबांच्या झाडाची साल कुटुन बारीक करून खोबरेल तेलात मिसळून तो लेप ते रोज पायाला लावत होते. लिंब हा कडु वृक्ष पण त्याचा कडवटपणच सुष्म किटाणू मारक असला पाहिजे नव्हे मारक आहे. त्यानेच ती जखम भरायला लागली होती. लिंब सालीचे भुकटे अन तेल. तेल हे जखमेत पाणी जाऊ देत नाही आणि साल जखम दुरुस्त करतं होती. अश्या पद्धतीने काही दिवसात पुन्हा तो माणुस चालायला लागला. यावरून असं वाटतं. "देव तारी त्यास कोण मारी " यावरून असं वाटतं आयुर्वेद मध्ये अशी ताकत आहे.जिचा योग्य वापर केला किं कुठलापण आजार नैसर्गिक पद्धतीने बरा होऊ शकतो.आयुर्वेदिक औषधं. म्हणजेच झाडपाला वापरून जी पद्धत ती पण खूपच गुणकारी होती. आता भोंदू ( डुप्लिकेट) आयुर्वेदिक डॉ.गल्लोगल्ली लोकांना फसवणारे दिसताय. ज्यांच्या जवळ कोणतीही डिग्री नाही किं शाळा नाही. फक्त लोकांना फसवणे हा एकमेव उदयोग काहींचा. ओरिजिनल शिकलेले आयुर्वेदिक डॉ. यांचा सल्ला घेणं केव्हापण चांगलं. असो हा विषय ओघात आला म्हणून सांगितला. मूळ कथा सांगायचं कारण आपल्या लक्षात आलं असेलच.हे झालं आयुर्वेद वरील उदाहरण.
तसंच दुसरं उदाहरण. गावात एक चांभार समाजाचा एक ग्रहस्थ राहत होता. त्याची पत्नी वारली मुलगा अन तो फक्त. गरिब परिस्थिती होती त्यांची. मोलमजुरी करणं अन खाणं. त्यात त्यांना व्यसन. एकदा तो ग्रहस्थ डोक्याला मार लागल्यामुळे जखम झाली होती. मग आजारी पडला. जखम इतकी खोल झाली परिस्थिती नसल्यामुळे उपचार पण नाही. काही दिवसात जखमेत अक्षरश्या जंतू (किडे )पडलेत. जखमेतुन अन नाकातून किडे बाहेर पडु लागलेत. मग त्याला गावातील डॉ.कडे घेऊन गेलेत डॉ. नि बघितलं अन सांगितलं यावर माझ्याकडे काहीच उपचार नाहीत.तो माणुस तेथेच डॉ. दवाखान्याच्या ओट्यावर पडून राहिला. रात्री डॉ. यांनी धाडस केलं आणि गुपचूप त्यावर उपचार करायचं ठरवलं. त्याच्या मुलाला बोलावलं अन सांगितलं आता शेवटचा उपाय करू सकाळ पर्यंत जगला तर ठीक नाहीतर असंही हा मेलाच आहे.कुठलं तरी जालीम औषध ची पूर्ण बाटली त्याच्या जखमेवर टाकुन दिली. निदान मरायच्या अगोदर किडे तरी बाहेर निघून जातील. पण चमत्कार घडला सकाळी तो माणुस उठून बसला. जखमेत एकपण जंत नव्हते. नंन्तर तो व्यक्ती दहा पद्रा वर्ष जगला. या वरून आपण काय तो वरील शीर्षक प्रमाणे बोध घ्यावा.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मोबाईल. 9922239055
.jpg)

आयुर्वेद हा परिपूर्ण वैद्यक शास्त्र आहे यात शंका नाहीं, प्रत्येक वनस्पतीत औषधी गुण आहेत फक्त वैद्य जाणकार असायला हवा
ReplyDeleteNice
DeleteNice
ReplyDelete