आयुर्वेद ✍️
आयुर्वेद
करी रामबाण उपाय
जरी झाडपाला हाय
कुटत आपली माय
पूर्वी हाची उपाय.
पाहुन सांगे रोग
लावत झाडपाल्याचा भोग
पळे त्यातून रोग
शरीर राहे निरोग.
ठेवतं मंगटावर बोट
समजे वैद्याला पोट
सांगे खाल्लेलं ताट
दावे त्यातून जीवनवाट.
असे वैद्यकीय विद्यापीठ
मुलं त्यात धीट
करतं रोगी नीट
राहत माणसं फिट.©️®️
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव. पिन 425108

Comments
Post a Comment