गावाकडची मजा क्र 1✍️
!! गावाकडची मजा!!
घरं मातीची सारी
सडा रांगोळी दारी
माणसं निरोगी शेतकरी
बैलजोडी असे भारी.
शोभे जात खिंल्लारी
पाणी पीत तळ्यात
रास पुजन खळ्यात
भाजीपाला राहे मळ्यात
गावाचा असे थाट
घरात राही माठ
पक्ष्यांचा राहे किलकिलाट
सुंदर उगवे पहाट.
गार गार वारा
चोहीकडे हिरवा पसारा
रानी मोर पिसारा
काठी वाहे झरा.
वासरू फिरे गोठ्यात
फुलपाखरू उडे रानात
वारकरी भेटत वाटेत
कीर्तन भजन गात.
आंबे चिंच बोरं
तोडत सारी पोरं
नाती जपत खरोखर
समृद्धीचं भासे माहेर. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


छान
ReplyDeleteछान
ReplyDelete