मजा गावाकडची क्र 2✍️
गावाकडची मजा
गावाकडं राहतो सर्जा
हाकतो शेतकरी राजा
भिगीभिगी गाडी पळवे
मुलांना वाटते मजा.
पाहुन आठवणी ताज्या
खायला रान भाज्या
ईर पीर वेशिवर
घाबरू नको राज्या.
गावात मारोती नंदी
वाडे पडकी चिरंबंदी
खेळायला नसे बंदी
उड्या झाड फांदी.
हवा राहते शुद्ध
आनंदी अबाल रुद्ध
हसे गौतम बुद्ध
मन साऱ्यांचं शुद्ध.
सोई असतात कमी
पण जगण्याची हमी
मजा येथील निराळी
चला जाऊ तुम्ही आम्ही.
गावाकडं मजाच न्यारी
भाकरीची असते न्याहरी
माणुसकी हृदयात भरी
आदरर्तिथ्य सर्वांचे करी. ©️®️@ लागु.
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


छानच
ReplyDeleteबहुत ही बढ़िया रचना
ReplyDelete