डॉ.ए पी जे अब्दुल कलाम ✍️
!! डॉ. ए पी जे अब्दुल कलाम. !!
थोर शास्रज्ञ् डॉ.कलाम
संशोधन त्यांचं काम
असत्य ठेवतं लांब
सत्यावर असतं ठाम.
ठेवली मैत्री पुस्तकांशि
नातं जपत मुलांशी
काळजी घेऊन दुःखीतांची
नाड ठेवतं सृष्टीशी.
स्व.संपत्ती वाटली गरिबांना
जाण होती त्यांना
संन्मान दिला देशाने
कीर्ती पसरली यशाने.
करून काटकसर देशात
इस्रो पोहचली विश्वात
यान सोडली अंतराळात
अभिमान मना मनात.
प्रेरणा दिली वाचनास
पसरला वाचनाचा सुवास
वाचन प्रेरणा दिन
त्यांच्या जन्म दिनास. ©️ ®️
प्रदीप पाटील
मु. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो.9922239055


Supereb Sir. Thank you For Nice Poem on Birday of Our Guru.
ReplyDeleteRegards
Milind Chaudhari
General Secretary
Dr. APJ Abdul Kalam International Foundation, House Of Kalam, Rameshwaram
थँक्स सर 👏
ReplyDelete