आताची दिवाळी ✍️

 



                  

!!आताची दिवाळी!!    

आली आली दिवाळी 

सणाची खुप गोडी 

खुप फटाके फोडी 

पैसा सारे उधळी.


जात नाही आजोळी 

कुटुंब लहान थोडी 

घालता फक्त रांगोळी 

मजेत लाइटिंग उजेडी.


घराला लागतो रंग 

खेळायला नसतो संग 

गेला सारा आनंद 

बदलले जीवन रंग.


विकतचा सारा फराळ 

लावत प्लास्टिक माळ 

कुणालाच नाही कळ

मिठाई दुकानातली गोड.


संपत्ती भरपूर पूजेला 

दोघेच बसता मोजायला 

नुसतंच असतं बघायला 

दुःख होतं आजीला .


पिढी सारी बदलली 

भौतिक सुखात वाढली 

मन अशी जुळली

सारी आता सुधारली.©️®️



प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055




Comments

  1. वास्तव कविता... खूपच छान...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे