जीव शास्र ✍️
!!जीव शास्र!!
शास्र हे जीवांचं
नातं तेच शिवांचं
देणं सारं पंचत्वाचं
वस्ती ती किटाणूची.
जी आहेत सजीव
शास्रची हिच निव
चल अचल शिव
काही प्राणी पाळीव.
झाडं झुडपं कीटक
सुष्म काही काटक
अमिबा ते हत्ती
सार त्यात शिकवतं .
सजीव अभ्यासाला म्हणतात
जीव जीवन शास्र
कोणती वापरतात अस्त्र
भाव तेच मिश्र .
एकावर अवलंबून दुसरा
खातो त्याला तिसरा
जीवावरच चालतं जीवन
जीव सारा भित्रा.
वर वाटतो हसरा
आतुन जीव घाबरा
लहान खातो मोठा
खेळ पोटाचा सारा. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


very nice 👌👌👌
ReplyDeleteso creative and meaningful construction