घर ✍️ ( क्र 3)
!! घर !!
असावा सुंदर बंगला
गजबजलेला माणुसकीनं भरलेला
आप्तेष्ट यांच्या येण्याने
सतत भासतो बहरलेला.
सडा, रांगोळीनं सजलेला
बाळ गोपालांच्या किलकीलाटाला
सुमधुर आवाज कानाला
तुळशीपाशी दिवा सांजेला.
कुटूंबाच्या एकीनं फुललेला
सुना लेकिंनी पूजलेला
आश्रय दिला वाटसरूला
मान संन्मान वडीलधार्याला.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
मु.पोस्ट. गणपूर
ता. चोपडा जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मोबाईल. 9922239055©️®️
.jpeg)
Comments
Post a Comment