मोर ✍️
!! मोर !!
नर आहे पक्षी
लांडोर असते मादी
होतो त्यांचा विवाह
चालते मग गादी.
ऋतू येता तिला
फुलवते मस्त पिसारा
सौदंर्य खुलतं धरा
सुटतो गार वारा.
मादी पाठीवर मोर
समागम तेच थोर
अंडी देत लांडोर
उगवते महिन्यात लवकर.
राष्ट्रीय पक्षी मोर
अंगावर पिसे चितचोर
कृष्ण ठेवे डोक्यावर
रंग छटा फार.
आकाशी इंद्र धनुष्य
रानात फिरे लांडोर
कळी खुलवे मोर
कुटुंब दिसें सुंदर.
पीस ठेवतं पुस्तकात
अभ्यास राहत मनात
गालावर छान फिरवतं
मऊमऊ मन लुभवत .©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
मु. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


Chan
ReplyDelete