कबुतर ✍️
!! कबुतर !!
चिट्ठी बांधून पायाला
पोहचवे बरोबर सखीला
शांत हा पक्षी
मानवाच्या येई कामाला.
निरोप देई सर्वाला
राहणं याचं घराला
मुलं ठेवे बाजूला
जाऊन भेटतो आभाळाला.
मानव प्रिय पक्षी
आहे खुप गुणी
शरीर असतं गरम
मास आजारात बहुगुणी.
विष्टेत पिसात किटाणू
ते आपण मानु
लांब त्यांना ठेवु
शांत स्वभाव जाणू.
धूत संदेश शांततेचा
उंच माडीवर राहता
दाणे टिपून खाता
मन भरते जनता.©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


very nice poem
ReplyDelete