भजन ✍️🕉️
!! भजन !!
नाम देवाचं घेत
गायिले ते भजन
संतांनी लिहले भजन
टाळ, मृदूंग वादन.
सुख दुःखात म्हणतं
प्रबोधन संत करतं
अद्धश्रद्धा करून निर्मूलन
श्रद्धाळू गीत गात.
वारकऱ्यांनीं चालवली परम्परा
भजन पोहचले घरोघरा
संत संगत धरा
हाच बोध खरा.
संत तुकाराम, एकनाथ
नामदेव ज्ञानेश्वर चोखामेळा
भरत लोकांचा मेळा
गावोगावी भजन सोहळा.
परंपरा दिसते प्राचीन
गुंफत नामस्मरण वीण
ठेवून प्रबोधन जाण
लोकहितार्थ भजन गाण .©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मोबाईल. 9922239055
.jpeg)
सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteKhup sundar
ReplyDeleteMast 👍🏻😊
ReplyDelete