अर्धांगिनी ✍️
!! अर्धांगिनी !!
नराची तु नारी
घराची तूच कारभारी
कामं करतेस सारी
टाकुन रांगोळी दारी.
साथ संगत देत
घेऊन हाती हात
सुविचार सांगतं जीवनात
मुलं सांभाळ घरात.
शिकवण तिचीच मुलांना
देवपूजा तोडून फुलांना
धुणं,भांडी, चुल
स्वयंपाक वाढून सर्वांना.
तरी उपेक्षित तीच
करून सारी कामं
भारी सदा मीच
म्हणते माझाच राम.
देते तीच आधार
सोबतीने मिळे जनाधर
जोडी लक्ष्मी नारायणाची
तिजमुळे जीवन सार.
कथा सारखीच सर्वांची
नराची तीच नारी
बाजु सांभाळत सारी
स्वच्छ निर्मळता घरोघरी .
©️ ®️ @ लागु
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा.
जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मो. 9922239055

खूप छान शब्दरचना. 👌👌👌👌
ReplyDelete