पानगळ (क्र 3)
!!पानगळ!!
ऋतु संपला पावसाळा
भरला थंडीचा सोहळा
वृक्ष जागृत थोडा
जीव आहे भोळा.
येईल पुढे उन्हाळा
बसतील उन्हाच्या झळा
थोडया सोसून कळा
सोडी अंगावरून पालापाचोळा.
दर वर्षी पानगळ
सोहळा भरवता वृक्ष
सोडतात जुनं सारं
ठेवून जीव साक्ष.
ठेवून निर्मिती कास
येणार नवं खास
फुटेल नवं पालवी
मनात ठेवून आस.
अचल वृक्ष सारी
किमया त्यांची भारी
करतात पुढील तयारी
गळ देते उभारी.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment