स्वागत नवं वर्ष्याचे ✍️
!! स्वागत नवं वर्ष्याचे !!
करू स्वागत सर्वानी
भरू आनंद मनात
क्षण सुंदर जीवनात
नाचु गाऊ सणात.
नवं वर्ष्याचं पर्व
पाहणार सुंदर सर्व
पाळूयात माणुसकी धर्म
नको माणसात गर्व.
सुकाळ येवो चोहीकडे
जीव सारी वेगवेगळे
करू कर्म आगळेवेगळे
आनंदी असोत सगळे.
पाळू सद्विचार स्वतः
बायबल कुराण गीता
आदर करू साऱ्यांचा
अंगीकारू सर्वधर्म संहिता.
स्वागत करू नव्याचे
सारं जीव सजीवांचे
पर्व आलंय जगण्याचे
टिपू क्षण आनंदाचे.
प्रदीप मनोहर पाटील
मु. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


अप्रतिम दादा साहेब
ReplyDelete