जीव सृष्टी ✍️
!! जीव सृष्टी !!
जीव आहे सृष्टी
चल अचल भाग
नाही कोणाला राग
असते सर्वांना जाग.
जीव करतो राबराब
पोटासाठी सारं भागमभाग
वाटून खाऊ समभाग
लावु वृक्ष साग.
किमया दोघांची भारी
अचलवर जगता सारी
एक निर्मिती करी
दुसरा देतो उभारी.
अचल खाता जीव
चल चालता सजीव
बनते त्यातून विष्टा
जगता अचल जीव.
चल विष्टा खत
सृष्टी फुलते रातोरात
पिकवते पाण्यात भात
जमिनीतुन कांदा पात.
एक दुसऱ्याशी नाड
जपु सारं जीवापाड
चल अचल काड
पंचतत्वाचं सारं फ्याड.
येतं पंचत्तवातून सारं
मातीतुन निर्माण साम्राज्य
मिळून उभं सुरांज्य
बदल ठरलेलं राज्य.
फिरतंय सारं चक्र
कुठं होतं वक्र
आहे कुणा फिक्र
फिरतंय सृष्टी चक्र.©️ ®️ @ लागु.
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट गणपूर
ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


खूप खूप छान.......... शुभेच्छा तुम्हाला प्रत्येक कविता छान आहे दादा
ReplyDeleteखूपच छान. 👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम लेख वाचून खूप आनंद होत आहे तसेच इतर अनेक बाबतीत आपल्या कविता छान असतात त्याबद्दल धन्यवाद दादासाहेब नमस्कार
ReplyDelete