सरतं वर्ष ✍️
!! सरतं वर्ष !!
गेलं सुख दुःखात
जीवन गाणं गात
मिळंत अनेकांची साथ
जगणं असे दिनरात.
भरभर निघाला काळ
सकाळ दुपार संध्याकाळ
तीनशे पासस्ट दिवस
बारा महिन्याचा काळ.
जीवनातील गेलं वर्ष
जोडतं नाती स्पर्श
संघर्ष असतात खुप
कधीतरी असतो हर्ष.
पिकतात शेतात कणसं
कळतात सारी माणसं
वृत्ती प्रवृत्ती खुप
राहावं छान असं.
कुणी कसं असलं
गुण अवगुणात दिसलं
आपण घ्यावेत गुण
जग सुंदरच भासलं.
निरोप देऊ जाणाऱ्याला
सांगु छान येणाऱ्याला
सुंदर जगुदे जगणाऱ्याला
नांदुदे सुख पर्वाला. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


छान
ReplyDelete