जागतिक क्षयरोग दिवस ✍️
!!जागतिक क्षयरोग दिवस!!
दुर्बल शरीर! किटाणूचा हल्ला!
मारतात डल्ला! देहभर!!1
कमी अन्न द्रव्य!औषधं विद्राव्य!
सतत दया पेय्य! दयावं त्यांना!!2
कुपोषित असे! त्यांच्यातचं दिसें!
दुर्बलच भासे! क्षयरोगी!!3
अन्न खावं सारं! थोडंचं चौफेर!
सुष्म अन्न वार! अंगातच!!4
काळजी स्वतःची! घ्यावी स्वतः त्यांनी!
खोकलत यांनी ! रुमालात!!5
संसर्ग आजार! फुफुसात वार!
करतं बेजार! शरीराला!!6
औषधं वेळेत! घेतंच राहावं!
सदृढ बनावं!मनानेच!!7
जगात संदेश! रोग उपचार!
जागृती हा सार! मानवात!!8
सांगतो प्रदीप! अभंग वर्णन!
आज क्षय दिन ! जगभर!!9©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment