जागतिक हवामान दिवस ✍️
जागतिक हवामान दिवस
जागतिक दिन! हवा राहो शुद्ध!
नकोच अशुद्ध! पृथ्वीवर!!1
घेऊन काळजी! रसायन धुर!
प्रदूषण पूर! मोडूयात!!2
स्वछता निर्मळ! सुंदर आकाश!
सरळ प्रकाश! चोहीकडे!!3
निर्मिती करूया! कासच धरूया!
हेअंगीकारूया! जनतेनं!!4
वृक्ष पशु पक्षी! प्राणी मात्रा सारी!
हवामान तारी! सर्वांनाच!!5
नको प्रदूषण! हाच धरू पण!
वृक्ष संगोपन! सर्वदूर!!6
संकल्प सुदंर! सर्वांनी करूया!
सदृढ राहूया! जनतेनं!!7
शुद्ध वाहे वारे! आनंदी जगत!
राहूया प्रगत! जीव सारे!!8
सृष्टी भासे भारी! हवामान तारी!
अंगी कारी सारी! मानवता!!9
सांगतं प्रदीप! दिन हवामान !
लिहून ते छान! अभांगत!!10©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment