शहीद दिवस ✍️
!!शहीद दिवस!!
राज्य इंग्रज्यांचे! लढा क्रांतिकारी!
जहाल विचारी! तरुणाई!!1
स्वतंत्र सेनानी! ज्ञानी होते गुणी!
बंदूक धरूनी! क्रांतिकारी!!2
केलं जिवा रान! मिळून सारेच!
वाहिले वारेच! उठावाचे!!3
गोळा होतं गडी! धर्मात वेगळी!
सारे सवंगळी! आदर्शच!!4
स्व भगत सिंग! सुखदेव यांना !
साथ होती त्यांना ! राजगुरू!!5
झाली शिक्षा फाशी! हसत चढले!
लोकं सारी रडले!यांच्या साठी!!6
शूर पुत्र देशी! पळाले विदेशी!
घडलं स्वदेशी ! भारतात!!7
शहिद जवान! मिळवत मान!
फडके तिरंगा!अभिमान!!8
आदर्श झालीत! हिंदुस्थानी सारी!
उरे कीर्ती भारी! त्याविरांची!!9
दिवस शहीद! सलामी देऊया!
विरता सांगूया ! सुपुत्रांची!!10
कथा अभंगात! वर्णन सांगतं!
साहित्य लिहीत! प्रदीपच!!11©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
.webp)

Comments
Post a Comment