वाट माहेरची ✍️
वाट माहेरची
वाट पाहे दादा माझा भाऊराया
येईल बहीण अक्षय तृतीया
बांधेल झोका तिला नित्य झुलाया
देऊ काय हो बहिणीला वानोया.
दर वर्षी सण दिवाळी दसरा
सारे करतं हो एकत्र साजरा
बहीण गेली हो सासुरवाडीला
कुटुंब एकीचा गोडीचा माजरा.
प्रेम माया हिच भाऊ बहिणीची
शिकवण हिच साऱ्या कुटुंबाची
आई वडील नंन्तर माझा भाऊ
उणीव न भासे आई वडिलांची.
रुजवली माया ममता घरात
सारेच राहत कुटुंब प्रेमात
आनंद मावेना आमच्या मनात
संस्कार संस्कृती बहीण भावात.
होईलच माहेरी तोच हो थाट
माझ्या माहेरची हो सुंदर वाट
नित्य हो जातेच मी सणा सुधीला
अक्षय तृतीयेला जाण्याचा घाट.
मनात हि वाट माहेरची आहे
सांगतांना भाऊ प्रदिपच दिसें
क्षण भंगूर जीवन हेच भासे
नाती सारी एकीत सारीच असे.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment