अक्षय तृतीया ✍️
अक्षय तृतीया
क्षय नं होई ती अक्षय तृतीया
सण हा शुभ मोहरतेचा राजाचं
गोड धोड पुरणपोळी खाऊनी
आनंदात करतात साजराचं
गोळा होता नाती गोती सारी सारी
बहीण हि भावाच्या सणाला दारी
कुटुंब अकोप्यात साजरा करी
गोडी नात्याची सुंदर सारी भारी
शेतातील कैऱ्या होई त्यांचा आंबा
महत्व सणाला खांदेश वासीन
आई लक्ष्मी माहेर खांदेश तिचे
येते हो अक्षय तृतीया सणाला
माहेरात सासर सोडुन हिचे
आनंदात सारे कुटुंब एकत्र
जेवणाला आठवण पूर्वजांची
नैवद्य ते दाखवता अगोदर
सुरवात हो मग गोड खाण्याची
शुभ आरंभ सुरु अक्षय पर्व
धन धान्य सुख समृद्धीत सर्व.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment