श्रद्धा ✍️
!! श्रद्धा!!
मनी असावी हो देवावर श्रद्धा
नको कुठं थारा देऊ अंधश्रद्धा
गंडे दोरे धागे नकोत तोडगे
देव ब्रम्हा विष्णु महेश ते बुद्धा.
थारा नाही हो कुठं हि अंधश्रद्धा
आई वडील दीन दुःखी समवेत
जे असती नित्य त्याच्या सोबतीत
देव तेथेच भक्तांला भेट देत.
जीव सृष्टी जिवंत असती जीव
त्यांची जी मानव करतील कीव
त्यांना मिळे जीव लोक भाव
आचरणात असावा सदभाव.
देव जीवनात आत्म्यात शोधावा
जाणावा मानावा जीवांच्या हृदयात
चल आणि अचल जीव सारीच
आई वडिलांच्या असे पदरात.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर तालुका चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment