मृगजळ सर्व ✍️



!!मृगजळ सर्व!!


देवा तुझं पर्व! सदा काळ सर्व!

आहे तुझा गर्व! जीवनात!!


सुक्ष्म ते शरीर! दिलं सर्व काही!

मन वेडं होई! जगतांना!!


हवं नको सांगे! नको तेची पाही!

दुःख मनी राही! सदोदित!!


तुझी आस लागो! मन माझं जागो!

संग तुझा लाभो! नेहमीच!!


कोण कोणा नसे! स्वार्थी खुप दिसें!

वोढतांना भासे! सारे काही!!


किती केलं सारं! राहणार येथे!

येणार मी तेथे! एकटाच!!


डबक्यात राही! मोठं खुप वाटे!

दुकानचं थाटे!स्व स्वार्थाचे!!


कधी समजेल! याचं देहाला!

तुझ्याच नेण्याला! घाबरतो!!


अल्प मिळे वस्र! शरीराचं शस्र!

पंच तत्व मिश्र! मृगजळ!!


प्रदीप सांगतो! देहाचीचं कथा!

जीवनात व्यथा! साऱ्या देहा!!©️®️


प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे