तुझ्या मुळे ✍️
!!तुझ्या मुळे!!
देह तुझा देवा! अमूल हा ठेवा!
सर्वांना तो हवा! सुखरूप!!
दिलं तुम्ही रूप! चढतो हुरूप!
बघतो स्वरूप! चोहीकडे!!
भोग ते भोगून! यातना फिरून!
राहतो स्मरून ! मनुष्यात !!
लक्ष योनी फिरे! मग देह मिळे!
तेव्हा आम्हा कळे! देवा तुचं!!
नाम तुझं घेता! दर्शन हो देता!
पावन ते होता! तुझ्या मुळे!!©️®️ @.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055



Comments
Post a Comment