समता क्र. 1

 समता 


समता हवी सर्वांना 

हक्क सारखाच हवा

स्त्री असो वा पुरुष

समान करता दावा.


कोण करतंय हेवा

कोणी करतं दावा

एक म्हणतो गाजवा

दुसरा सांगे सजवा.


जाती पाती नकोतच

सांगतात सर्व जण

धर्म पंथ जावेतच

मानवता हाच सण.


कोसळाव्यात या भिंती

वाटतं मनात साऱ्या

घरी आलं भाऊबंद 

 भाकरी आपल्या न्याऱ्या.


इतरांना देता बोध

घेतला जरका शोध

राजकीय चाखे मद

उच्च नीच करे भेद.

 

मन एक ओठावर

दाखवी सारं सुरेख

दुसऱ्याची हवी लेक

आपली नात्यात देत.


दुसरे चालतं नाहीत

स्वतःला म्हणता श्रेष्ठ

वागणं असतं दृष्ट

सांगणं सर्वांना पष्ट.©️®️


प्रदीप पाटील

गणपूर जळगाव

मो. 9922239055


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे