आजोळ ✍️ क्र. 1

 आजोळ 


जीव सुरवात माळ 

होई येथे थोडी वाढ 

जुना होता तोची काळ 

रांगत येथेच बाळ.


दोन गावं घेतं ठाव

जुळे वीण घठ्ठ राव

जरी भिन्न असे नाव

कुळ खाई सारा भाव.


जात एक बघे नाव

तेथेच जुळतं गाठ

नात्यात साराच थाट

सुंदर जीवन वाट.


अंश रक्तात उतरे

आजोळचा आईतून

वाढ होई मायेतुन 

साठे आठवणीतून.


गावाची असते छाया

आजोळची असे माया

आई बघे भाऊराया

नात्यांची सारी किमया.©️®️


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे