आजोळ ✍️ क्र. 2

 आजोळ 


अंश सुरवात पाया

लावी जीवाला हि माया

दोन जीवांची हो छाया

निर्मिती लागी कराया.


सार भिनला रक्तात

 जोडलं सारं हृदयात 

जोडी आई वडिलांत 

आठवणीत हयात.


वीण जुळली नात्यात

आलो आपणही त्यात 

गाव प्रत्येक नात्यांचं

कोणाचं आजोळ यात.


 जन्म यातच हो होई 

हंबरे गोठ्यात गाई

रांगली येथेच आई

सोबत पूर्वज पुण्याई.


वाट वळणाची भारी

दिसतं डोंगर दरी

आठवणीत नवलाई

मन हे उभारी भरी.©️®️


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

जिल्हा. जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे