घालत होता माझ्यावर घाव ✍️
घालतं होता माझ्यावर घाव
थकला बिचारा विसावला सावलीत तोच राव
आजपर्यंत कित्तेक अशीच विसवली माझ्या सावलीच्या पदरात
तरी मानव अशीच पैदास सृष्टीच्या उदरात
आजवर जगणं वृक्ष म्हणून आमचं न बोलता देणंच नशिबात
सजीव सारी जगताय आमच्याच जीवावर तरी का करता आमचाच घात
अचल जीव आमचं आम्ही वाढतो
चल जीव नियमित असंच ओर्बाडतो
खूप मारत गेलेत आजवर असंच जीवांना
सांगणं आहे आता भावांना
कर्म फळ मिळतील त्याची लवकर
मग सुरु होईल सारीच तडफड.©️®️.
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment