मनास झोबतो गारवा ✍️
" मनास झोबतो गारवा "
नेहमीच राया तूमची घाई गारवा सुटलाय लै
अहो थांबा थंडीत शेकोटी पेटलीय शेकून घ्या लै!!धु!!
वाऱ्याला आलं तुफान, थंडी नं घातलं थैमान
अंगात हुळहूळी भरली, आहे जरी मी लहान
साथ तुमची लाभली, आहे मला अभिमान
थांबा जरा शेकोटीवर, ऊब घेऊ दोघं छान.!!1!!
या तरुणपणी वेडावलं, हवेत मला संगतीला
मजा येईल रात्रीला, सोबत बसु पंगतीला
एक ताटात जेवु, खास भरवेल तुम्हाला
आनंद मिळेल मनाला, पळवू जरा गारव्याला!!2!!
या या थंडीत धुंद मला चढली
तुमी मलाच नजरेनं निवडली
असंच राहूद्या मांडीवर तुमच्या पडली
संधी मिळाली आज थंड मी पडली!!3!!
आग जरा लावा तुमची पण
जरा बसा ऊब मिळवु आगीत
रंग भरू आज क्षण गारव्यातले
भरल्या विस्तवावर थेंब जरा शिंपडीत.!!4!!
प्रदीप पाटील
गणपूर जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment