नजर ✍️
" नजर "
डोळ्यात तुझे उमटले भाव
खलास झालो आज मी राव
बघतं राहावं वाटतं असंच
घेतं तूझ्या काळजाचा ठाव
कटाक्ष तुझा करतोय हैराण
हृदयात मलम तुचं आता लाव
मनात फुलला आहे आनंद
आता खाऊ नको तु सुद्धा भाव
बघतोय तुझा सुंदर पेहराव
प्रेम साजेसे तुझे हावभाव
असंच बघतं राहावे वाटते
नजरेतले तुझ्या प्रेम भावते
तुझ्या डोळ्यांनी केलं कैद
मिठीत यावं असंच बोलावते
नजरेतूनी करु नको घायाळ
प्रेमात तुही आता सुखावते ©️®️
प्रदीप पाटील
गणपूर.जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment