राष्ट्रीय सुरक्षा दिन ✍️
4 मार्च
राष्ट्रीय सुरक्षा दिन
दिन यावेत सुखाचे
नको वक्र शत्रू दृष्टी
बंदूक गोळी वापरू
रक्षण्या देशाची सृष्टी.
युद्धनौका नौदलात
सैनिक सैन्य दलात
हिंमत पायदळात
वैमानिक विमानात.
रॉकेट रडार सेवा
अमूल्य देशाचा ठेवा
रणगाडा तोफ गोळा
साठा भरपूर हवा.
पानबुडी जल वेडी
शत्रूला करते खुळी
सोडते रॉकेट गोळी
जहाज क्षणात फोडी.
देश रक्षण करण्या
जनता सुखी दिसण्या
जल भु वायु सारीच
सुरक्षित त्या असण्या.
सक्षम आहे हि सेना
मूल्य त्यांचं तुमी जाणा
जागृती जनात आणा
जाणू देश सेवा बाणा.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment