आमची माती ✍️
"आमची माती "
आमची माती सोबत आमची माणसं
माणसं देती आनंद माती देते कणसं
कणसं भरता पोट विक्रेता होतो शेट
शेट भटजी मजेत शेतकरी जीवनात दारिद्र्य भेट
भेट घेता राजकारणी सांत्वन करी थेट
थेट मरतोय शेतकरी राजा मस्त खातेय प्रजा
प्रजा राहतेय उपाशी राज्यकर्ते असता तुपाशी
तुपाशी राहणं गेलं शेतकऱ्यांचं झीझने नशिबात आलं
आलं नशिबात कष्ट करणं मातीत गाडणं हेच धोरण
धोरण राबवता मारण्याचं तोरण बांधत घरचं©️®️
प्रदीप पाटील
गणपूर. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment