जागतिक वन्यजीव दिन ✍️
3 मार्च
जागतिक वन्यजीव दिन.
जीव पशु राही वनी
गात स्व जीवन गाणी
अस्तित्व ठेवी टिकूनी
हिंश्र त्यात काही प्राणी.
बाकी साधी भोळी गुणी
जीव जीवश्य जीवन
शांत सुंदर ते वन
हिरवाईने नटे रान.
वृक्ष पशु पक्षी जीव
काळजी घेऊ सजीव
वाचवूया वन्यजीव
कार्य त्यांच हि भरीव.
निसर्गाचा खेळ सारा
निर्मळ निर्मि पसारा
जीव चक्र कार्य निव
आल्हाद मोहक वारा.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment