दिप पुजन दिवस ✍️

 


दिप पुजन दिवस 


देव आषाढी एकादशी च्या नंन्तर चा हा दिवस देव निद्रिस्त अवस्तेत जातात. आषाढ एकदशी दिवशी नंन्तर या दिवस पासून देव झोपली असतांना. त्या दिवसा नंन्तर देवाचे नामस्मरण सदैव करायचं असतं. चार महिने देव झोपलेली असतात. त्या चार महिन्याच्या कालखंडात आषाढ नंतर सर्व देवी देवता श्रावण, भाद्रपद,आश्विन, कार्तिक कार्तिकी जी खोपडी एकादशी असं सुद्धा म्हणतात. तिथं पर्यंत देव देव मानवाने सदैव विविध देवी देवताचे जप करतं नाम घेत तप करायचा असतो असं पुराणात सांगितलंय.त्यांच आषाढ नंन्तर येणारी अमावस्या हि सम्पूर्ण काळी रात्र असते म्हणून जीवनात सुद्धा काळ रात्री येऊ नयेत म्हणून दिप,दिवे, समई नंन्तर पूर्वी काळी कंदील, चिमणी, आकाश कंदील, बत्ती ई.या सारख्या प्रकाश देणाऱ्या सर्व वस्तू पुजन करायचा दिवस सकाळ पासून सुरु होतो. सकाळी देवाचं नाम घेत या घरात,गोठ्यात, अंगणात, रस्त्यावर प्रकाश देणाऱ्या सर्व वस्तू देव देव्हाऱ्यात किंवा त्याच्या बाजूला समोर स्वच्छ करतं सर्व पूजन करायच्या असतात. यांचे पूजन करणं म्हणजेच देव निद्रिस्त झोपली असतांना आपल्याला प्रकाश अमावस्या किंवा रात्री संकटात आपणच मार्ग काढायचा जीवनात उजेड निर्माण करायचा हा त्या मागील उद्धेश. या पर्वात कोणतंही लग्न, मुंज सारखे दोन जीव मिलनाचे विधी करायच्या नसतात असंच यातून सांगितलंय. देव झोपलीत तर जीवांनी फक्त देव कार्यात मग्न राहायचं आणि स्व प्रकाश कसा निर्माण करता येईल ते पाहायचं. संकट आलं तर त्यांच निवारण स्वतः प्रकाशित होऊन करायचं. रात्रीच्या गर्भात अंधारात देव झोपली असतांना जीवांनी पुनरनिर्मिती केली तरी चालेल असा काळ. दिवसा देव,दान,धर्म रात्री सर्व निर्मिती कर्म केलं तरी चालेल. सृष्टी वाढीला दिलेला पावसाळी कालखंड असंच मी म्हणेल. धर्म शास्र असं म्हणतं जीव मिलन कार्य जीव उत्पती साठी बीज अंकुरण करणं त्या साठी हा कालखंड दिलाय. पण मानवाने फक्त निसर्ग चक्र तोडलं ईतर साऱ्या प्राण्यांनी पूर्वापार नुसर्ग चक्र नुसार आपलं आपलं प्रजनन उत्पती करतं असतात. माझं म्हणणं काही लोकांना पटणार नाही पण ठराविक वेळेलाचं प्रत्येक जीवांचा उत्पती बीज अंकुरण काळ होता अन आहे. मानवी जीवन मध्ये पावसाळा सुरवात हा मिलन काळ होता. दोन जीवांचे मिलन दृष्टीस कधी पडलं तर त्यात व्यत्यय आणु नये. मग ते कुठल्याही पशु पक्षी यांचं असो. ते जर दिसलं तर शुभ मानलं गेलंय. का तर जीव निर्माण होतेय त्यात अडथळा बनु नका मग प्राणी कोणताही असो. असा हा पावसाळी काळ ज्यात देव आठ महिने आपलं रक्षण करतं असतात. ते या चार महिन्यात आपल्यात आहेत पण निद्रिस्त आहेत. मागे मी यावर लेख लिहला होता. गटारी नव्हे गतहारी अमावस्या. मध्य प्राशन करणारे काही लोकं हि अमावस्या आली की आनंदी होता. दुप दिप लावल्या नंन्तर झालेल्या प्रकाशात आनंद व्यक्त करण्या साठी देव आळवण्या साठी या अमावस्या नंन्तर मध्य प्राशन करणार नाही म्हणून आज एक दिवस आंनद म्हणून मध्य सेवन कराता ते चूकच आहे. त्या मागील लेखात सारी मुद्धे आली आहेतच म्हणून तो उल्लेख यात नं करता.फक्त देव दिप पूजन दिवसा करून स्वच्छ प्रकाश रात्री निर्माण व्हावा म्हणून अमावस्या हि आपल्या आयुष्यात अंधारलेली होऊ नये म्हणून पूजा करण्या साठी देव कार्य शुभ आरंभ करण्याचा दिवस असं मी म्हणेल. चला तर सर्वांना देव दिवे स्वच्छ करतं सकाळी सकाळी सर्वांच्या जीवनात अंधार नाहीसा होऊ दे या प्रदीप पाटील कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत. दिप पूजन सर्वानी घरातील सर्व दिवे स्वच्छ करतं देव नाम घेत मनात आनंद भरत दिवस आरंभ करावा आणि येणारी रात्र काळी होऊ नये म्हणून लख्ख प्रकाश निर्माण करावा. पावसाळ्यातील सर्व रात्री अंधारलेल्या असतात. त्यात आपल्या कडील प्रकाश देणारी साधने हि स्वच्छ करून ठेवा. जसं युद्ध करायच्या अगोदर शस्र पूजन करता अगदी तसंच रात्रीचा अंधार घालवण्या साठी दिप स्वच्छ करतं देव नाम घेत पूजन करा.


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055



Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे