वारी माझी...

वारी माझी.


विठ्ठल मज अंतरी 
नाम मुखी सदा 
तीच माझी वारी 
सोबत सदा सर्वदा... 

देव देव्हाऱ्यात पूजा 
रोजच वारीची मजा 
खात्री कर्माने पावशील  
येशील ठोकावत दरवाजा.... 

दिन दुखींना मदत 
हिच करतो  पूजा 
 नसे  कुठं गाजावाजा
 वेडा भक्त  तुझा.... 

रान हिरवं करुनी 
करतो रोजच अन्नपूजा 
घडवला सृष्टी संग 
तूच माझा राजा.... 

सदोदित सोबतीला आहेस 
राबतांना आधार तुझा 
कष्ट पडतात रोज 
शक्ती स्तोत्र तुझा.... 

धावा नित्याच्याच म्हणुनी 
केलंस शेतकरी राजा 
भेटतोस धरणी पंढरीत 
धान्य  पिकवण्यात मजा.... 

जीवाला सुख शांती 
समाधान देतोस तूच 
तुझ्यात मी माझ्यात तूच 
वारी माझी हिच.... 


प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा जळगाव ©®

Comments

  1. प्रदीप भाऊ खूप सुंदर प्रयत्न...

    ReplyDelete
  2. अतिशय ऊत्तम, नेहमीसारखेच दजँदार

    ReplyDelete
  3. छान आहे वारी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे