उधळी ( मुंगी प्रजाती प्रकार ) ✍️



|| उधळी ||


प्रदिप पाटील. गणपूर 

प्रजाती  मूंगीतील लहान
राजाराणी राज्यकारभार मातीत
साम्राज्य वारुड किल्ला  
रचना बिळाची व्यवस्थित.

राजनिवास आत खास
वातानुकूलित हवा खेळती  
काळजी एकमेकांची घेती
बाळ आत  रांगती.
 
मार्ग खोल्या खुप
साठवण रहिवासी अनेक
अतिक्रमणाशी लढा देत
जगणे त्यांचे नेक.

सर्प आयत्या बिळात
राज्य करू पाही
सैनिक त्रासाने घायाळ
होऊनि घाबरून  राही.

राजा आदेश पाळी
कष्टकरी सैनिक मुंग्या
वरदान मिळाले  निसर्गाचं
पहील्या पावसात पतंग्या.

पाऊस  येतां ऋतुत
प्रजनन काळ तोचं
मादी मुंग्या खास
साम्राज्यांत वंश वाढ हेचं.

 राज्यांत घुसले पाणी
पंखफुटून बाहेर पडून  
उडून प्रकाशात बाहेर
जात आनंदात आपटून मरून.

किमया यांची भारी
मातीत राज्य उभारी
भुसभुशीत बळकट रचनाकार
इवल्या जीवाची भरारी.


प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
©®

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे