रेडिओ पांजरा साठी.

| |  रेडिओ पांजरा साठी  | |



1)
थेंब थेंब पडतंय पाणी 
पक्षी गाताय गाणी 
शेतकरी राजा करतोय पेरणी 
फुलली सारी धरणी.... 


2)
आला आला पावसाळा 
पावश्याने काढला गळा 
घरटे बांधली पक्ष्यांनी झाडा 
पेरणीला लागला शेतकरी भोळा.... 


3)
चला आनंद घेऊ पावसाचा 
सुगन्ध आला धरणीचा 
कळी  खुलली  मानवाची 
हंगाम आला पेरणीचा.... 


4) 
ढग आलेत भरून 
पाऊस आला वरून 
मनं आलंय भरून 
चला येऊ पेरून.... 


5) 
झाली पावसाची सुरवात 
मनात बहरली प्रेमवात 
राजा राणी आनंदात 
भिजली सारी पावसात... 


6)
वाऱ्याला आलं उधाण 
आल्हाद वाहतोय छान 
दिला ढगांनी मान 
पावसाने  भरले रान.... 


7)
 ढगांनी आणलं पाणी 
वाऱ्यास  आली मजा 
वाजवला ढगांचा बाजा 
विजांनी केला गाजावाजा.... 


8)
या मुलांनो या 
आनंद पावसाचा घ्या 
कागदी नाव वाहत
अंगणातून चालली पहा.

9)
ऋतू आला पावसाचा 
नाच सारा सृष्टीचा 
आनंद घेऊ हिवराईचा 
किलकिलाट सुरु पक्ष्यांचा.... 

10)
पाऊस पडतोय रानात 
उकळ्या फुटल्या मनात 
सखी आली जीवनात 
धुंद झालो गाणी गाण्यात... 

11)
पावसाने केली सुरवात 
विजांनी केला कडकडाट 
अर्धांगिनी शिरली बाहुपाशात 
भिजुनी आनंद गगनात.... 

12)
ढगातून पडतोय पाऊस 
गंधाळली सारी धरणी 
बीजांनी  केली अंकुरणी 
सारीच तिची करणी... 

13)
धुंद पावसाची निराळी 
झाली कशी वेडी 
सजणी  गं भोळी 
चिंब भिजली अवेळी.... 

14)
या रिमझिम पावसात 
धरलं  ढगांनी छत 
धुंद धरणी गन्धात 
बीज मोह अंकुरण्यात.... 

15)
आला आला वारा 
सोबत पाऊस धारा 
रंगला आठवणींचा सोहळा 
फुलला सारा मळा.... 

16)
झाली पावसास सुरवात 
आली सृष्टी रंगात 
गुंग सारी मृद गंधात 
दिसु लागली हिवराईत .... 

17)
 वाऱ्याने दिलं  ढकलुनी 
वीज बरसली कडाडुनी
रडू लागले ढग 
गळू लागलं पाणी.....

 18)
होती रात 
चिंब पावसात 
धुंद डोळ्यात 
गुंग नवनिर्मितीत.... 

19)
भिजली पावसात राणी 
वस्र गेले बिलगून  
पाहिलं तीस न्याहळुनी 
वीज उठली कडाडून.... 


20)
विजेने केला कहर 
पावसानं धरला जोर 
वाहतंय पाणी खळखळ 
अंकुर आलेत वर .... 

21)
विजांचा पडला प्रकाश 
धर्तीचा सुटला वास 
पक्षी लागली  खोपा करण्यास 
शेतकरी लागला पेरण्यास.... 

22)
वीज नाचली छमछम 
ढग वाजले धडाड धूम 
नदीनाले वाहू लागले खळखळून 
पशुपक्षी झालीत सामसूम.... 

23)
थेंब थेंब पडतंय पाणी 
पाण्यात लागली आग 
राधारानी चिंब पावसात
होता तो प्रेमभाग.... 
 24)


उठले पावसात तराणे 
गाऊ  प्रीत गाणे 
चिंब भिजू पावसाने 
आनंद घेऊ एकरूपाने... 

25)

पावसात भरली  धुंदी
आनंद भिडला गगनात 
चिंब पाखरं वनात 
नाचली ताल सुरात.... 

26)
काय ऋतू पावसाचा 
क्षण सारा आनंदाचा 
जीव सृष्टी बहरण्याचा 
प्रेम गीत गाण्याचा.... 

27)
पावसाची आली धुंदी 
अलगत आली बंधनात 
ढगांनी केला नाद 
किमया या थेंबात..... 

28)
सूर्याने   तप्त धरणी 
गेली सारी भेगाळूनी 
आलं पाण्यास कळुनी 
तृप्त  केलं बरसुनी.... 

29)
असय्य होतं ऊन 
पाणी गेलं वाफाळून 
ढगांनी घेतलं गिळून 
धरणीवर दिले सोडून... 


प्रदीप पाटील 
गणपूर ता चोपडा 
992223955
प्रदीप पाटील 
गणपूर चोपडा जळगाव ©®

Comments

  1. निसर्ग सुखाच्या आनंदात रमुन गेलं मन. हरपले मन झाले उन्मन .
    अतिशय छान.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे