आमदार ✍️
!! आमदार !!
पाच वर्ष साल
आहे तुमचा सालदार
पण थोडा मालदार
निराळी थोडी चालढाल.
तालुक्याचा करतो प्रतिनिधी
आणतो रांज्यातून निधी
प्रश्न थोडे सोडवतो
चालवतो तो गादी.
प्रचार करतो रडून
प्रश्न देईल सोडवून
दया मला निवडून
मत मागतो पायापडून.
आमिष दाखवून जनतेला
ज्याचं मत पटतं
तो जनता निवडते
नंन्तर महाभारत घडतं .
जनता होते सुखी
कधी करतो दुःखी
कारभार त्याच्या मुखी
तळे हाच चाखी.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव

Comments
Post a Comment