संगीत ✍️
!! संगीत !!
सुरु होतं गित
त्यास मधुर संगीत
फुलते त्यातून प्रित
मन होतं प्रफुल्लित.
विसरतं देह भान
जीवास मिळे समाधान
कळी खुले छान
होतो जीव रममाण.
थकलेलं कधी शरीर
गीताने मिळे धीर
डोले हातपाय शीर
तणाव पळे सैरभैर.
फुकते मनात जान
उठवतं त्यात रान
संगीत असतं छान
किती वर्णु गुणगान.©️ ®️ @लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Nice
ReplyDelete