हरण ✍️
!! हरीण !!
भित्रा आहे प्राणी
जगतो गवत खाऊनी
पळतो लांब धावूनी
राहतात कळप करुनी.
दिसतात सारे सुंदर
जंगलात असतं घर
मादी करते सांभाळ
बहुपत्नी असे नर .
मिळेल ती सोबत
सुखात छान राहता
एकमेकांना तेच जपता
काळजी सारे घेता.
संस्थन आहे प्राणी
हरण असतं गुणी
लोकं मारत शिकारितुनी
घेत तिला खाऊनी.
कातडी वाळवून ठेवता
पूजा अर्चना करता
आसन म्हणून ठेवतं
महादेव त्यावरच बसता.
सारखी असतात खुर
पळतात ते चौखूर
पाहुन बदलतो सुर
संख्या आहे भरपूर . ©️ ®️ @ लागु.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


छानच
ReplyDelete